सामर्थ्य फाउंडेशन, अकोला

कृतीतून परिवर्तनाकडे…

सामर्थ्य फाउंडेशन

‘सामर्थ्य’ ही आता अकोला (महाराष्ट्र, भारत) शहरातील एक प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था म्हणून समोर आली आहे. ‘कृतीतून परिवर्तनाकडे…’ या ब्रिद वाक्यावर दृढ विश्वास ठेवून सदस्यांच्या माध्यमातून सामाजिक काम करणे हे ‘सामर्थ्य’चे वेगळेपण आहे. संस्थेचे सदस्य केवळ आर्थिक मदत देण्यावर थांबत नाहीत, तर यथाशक्ती आपला वेळ, कौशल्य पण सामाजिक कार्यासाठी देतात. ‘सामर्थ्य फाउंडेशन’ ही संस्था सामाजिकसह सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, कृषी आदींसह वैविध्यपूर्ण क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे.

नवीन उपक्रम

सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

शहरातील सामर्थ्य फाउंडेशनने अल्पावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक कार्यातून आपले वेगळेपण जपले. ‘सामर्थ्य’ने दिनदर्शिकेतून सुद्धा ‘अकोल्याचा वारसा’ उलगडून मांडत अनमोल माहिती उपलब्ध करून दिली, असे प्रतिपादन श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त गजानन घोंगे यांनी केले. श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानच्या सभागृहात सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दिनदर्शिकेची प्रथम प्रत शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला अर्पण करण्यात आली.

धोरणात्मक सहभाग वाढण्यासाठी स्त्रियांना राजकीय आरक्षण – डॉ. नीलम गोऱ्हे

राजकीय आरक्षणामुळे स्त्रियांचा धोरणात्मकरित्या सहभाग वाढून देशाचा आणखी विकास होईल. लोकशाहीमध्ये आरक्षण महिलांच्या विकासाचे माध्यम आहे. राजकीय आरक्षणामुळे महिलांची जबाबदारी वाढली. केवळ सत्ता, खुर्ची व पदांसाठी नव्हे तर समाजासाठी महिलांना कार्य करावे लागेल, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे व्यक्त केले.

महिला अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची गरज – प्रा. अंजली आंबेडकर

समाजातील विकृती वाढत असून कमी वयाच्या मुलींवर अत्याचार होतात. स्त्रियांवरील हिंसा, कौटुंबिक अत्याचार, हुंडाब‌ळी वाढले. समाजातील हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. याविरोधात समाजातील जागरुक झालेल्या चळवळीतील महिला तसेच सर्व घटकांनी पेटून उठण्याची गरज आहे. एकत्र येऊन लढा दिला तरच या महिलांवरील अत्याचाराला पायबंद लागण्यास मदत होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या तथा विचारवंत प्रा.अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांमध्ये ‘सामर्थ्य’

‘सामर्थ्य’ने सामाजिक कार्यातून वेगळेपण जपले – गजानन घोंगे

शहरातील सामर्थ्य फाउंडेशनने अल्पावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक कार्यातून आपले वेगळेपण जपले. ‘सामर्थ्य’ने दिनदर्शिकेतून सुद्धा ‘अकोल्याचा वारसा’ उलगडून मांडत अनमोल माहिती उपलब्ध करून दिली, असे प्रतिपादन श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त गजानन घोंगे यांनी केले.

सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३ (मातृशक्ती विशेष)-तृतीय पुष्प

राजकीय आरक्षणामुळे स्त्रियांचा धोरणात्मकरित्या सहभाग वाढून देशाचा आणखी विकास होईल. लोकशाहीमध्ये आरक्षण महिलांच्या विकासाचे माध्यम आहे. राजकीय आरक्षणामुळे महिलांची जबाबदारी वाढली. केवळ सत्ता, खुर्ची व पदांसाठी नव्हे तर समाजासाठी महिलांना कार्य करावे लागेल, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे व्यक्त केले.

सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३ (मातृशक्ती विशेष)-द्वितीय पुष्प