आपल्या कृतीतून सामाजिक कार्याचा आदर्श पायंडा पाडणारे, शेकडो अनाथांचे नाथ, श्रेष्ठ मार्गदर्शक, अंध, अपंग, अनाथ मुलं-मुलींसाठी आपले जीवन वाहणारे ज्येष्ठ समाजसेवी डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी अथक परिश्रमातून उभारलेल्या अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह (आश्रम), वझ्झर, परतवाडा, जि.अमरावती येथे सामर्थ्य फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी भेट दिली.
यावेळी अंध, अपंग, अनाथ मुलं-मुलींसाठी डॉ. शंकरबाबा पापळकर करीत असलेल्या अलौकिक कार्याची प्रचिती सामर्थ्यच्या सदस्यांना आली. या आश्रमात १३० मुला-मलींचा सांभाळ डॉ. शंकरबाब करतात. त्यांनी आतापर्यंत १४० पेक्षाअधिक मुलींचे लग्न थाटा-माटात लावली आहेत. डॉ. शंकरबाबा यांनी सामर्थ्यच्या सर्व सदस्यांचे अतिशय आनंदाने स्वागत करीत संपूर्ण आश्रम दाखवत त्याची माहिती दिली.
डॉ. शंकरबाबा यांचे अद्भूत कार्य अनुभवून सामर्थ्यचे सदस्य भारावले होते. डॉ. शंकरबाबांकडून सामर्थ्यच्या सदस्यांनी सामाजिक कार्याचे धडे घेतले.