आज सामर्थ्य फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आदरणीय सत्यपाल महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. अकोल्याचे सुप्रसिद्ध कलाकार श्री सतीश पिंपळे यांनी हे सुंदर पोर्ट्रेट रेखाटले आहे.
या पोर्ट्रेट मध्ये सात ह्या अंकाला फार महत्व आहे. सूर्यप्रकाशात लपलेले इंद्रधनुषी सात रंग, सप्तपदी, सप्तनद्या, सप्तर्षी, आयुष्यात सात वर्षाच्या टप्याने होणारे महत्त्वाचे बदल, ई. अनेक आहेत. आपल्यासाठी भूषणास्पद असलेली आजची आपली सत्कारमूर्ती आदरणीय श्री सत्यपाल महाराज ‘सप्तखंजेरी’ वादक म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
त्यांच्या अनोख्या खंजेरीवादनातून, आधुनिक किर्तनातून ते सातत्याने समाजप्रबोधनाचे सत्कार्य करतात. त्यांच्या या कलेला मानाचे अभिवादन जग प्रसिद्ध चित्रकार श्री सतीश पिंपळे यांनी तयार केलेल्या चित्राद्वारे, सामर्थ्य फाऊंडेशन करीत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. श्री सतीश पिंपळे कोरोना काळात जरी नागपुरात होते तरी ते आता पून: अकोला येथे आले आहेत ही देखील आनंदाची गोष्ट आहे.
एक दोनच नव्हे तर चक्क सात खंजेरी अतिशय लिलया हाताळत असतांना, उजव्या हातातील जळता काकडा हा कुप्रथा दर्शवीतो, त्यावर आघात करीत, डाव्या हातातील खंजेरीला उच्च स्थान देणारे श्री सत्यपाल महाराज हात उंचावत हसतमुखाने प्रबोधन करतात.
त्यांना सामर्थ्य फाऊंडेशनचा मानाचा मुजरा!