पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२३

गणेशोत्सवात भक्ति-भावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपण्याऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट व जनजागृतीपर देखावा स्पर्धा आयोजित केली आहे.

प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार
(गणपतीची चांदीची फ्रेम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)
पुरस्कार प्रायोजक – चि.चिन्मय विनोद देव, अकोला.
तीन प्रोत्साहनपर पारितोषिक
(चांदीचे नाणे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)

प्रोत्साहनपर पारितोषिक प्रायोजक – स्व.श्री.दिनकरराव देशमुख (सेवानिवृत्त कलाशिक्षक) यांच्या स्मृतीनिमित्त : श्री.संजय देशमुख, अकोला.

नियम

  • संपूर्ण मातीची गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट असावी.
  • पर्यावरणस्नेही सजावटीसोबतच जनजागृतीपर देखाव्याला प्राधान्य.
  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी समन्वयकांच्या खालील कुठल्याही एका मोबाइल क्रमांकावरील व्हॉटस्ॲपवर आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांकासह आपल्या घरगुती गणेशोत्सवाचे छायाचित्र व एक लहान व्हिडिओ पाठवावा.
  • निवडक उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव स्पर्धकांकडे परीक्षक स्वत: येऊन निरीक्षण करतील. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • स्पर्धा संपूर्णत: नि:शुल्क असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२३.
  • स्पर्धा अकोला शहरापुरतेच मर्यादित.

स्पर्धा समन्वयक
रवींद्रकुमार बुलनकर:
मो.नं. – ९८८१२००३५५
सुर्यकांत बुडकले: मो.नं. – ९९७५१७१२७७
प्रशांत चाळीसगावकर: मो.नं.-९५०३४१७००२

पर्यावरणस्नेही उपक्रमात गणेशभक्तांनी अवश्य सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

सामर्थ्य फाउंडेशन, अकोला.
(नोंदणी क्र.- एफ-२१०४५)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *