सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३ (मातृशक्ती विशेष)-प्रथम पुष्प
मेळघातील महिलांच्या जीवनात सहजता, आनंद व समाधान आहे, त्या उलट शहरी भागातील महिलांमध्ये निराशावाद, असमाधानपणा आढळून येतो. मेळघाट व शहरी भागातील महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मेळघाटातील महिलांमध्ये स्वावलंबन आहे. विदेशात जाऊन आपण स्वावलंबन स्वीकारतो, तेच आपल्या देशातील शहरांमध्ये का स्वीकारले जात नाही? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी करीत साध्या गोष्टीतून आनंद उपभोगता आला पाहिजे, असा सल्ला दिला.