सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

शहरातील सामर्थ्य फाउंडेशनने अल्पावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक कार्यातून आपले वेगळेपण जपले. ‘सामर्थ्य’ने दिनदर्शिकेतून सुद्धा ‘अकोल्याचा वारसा’ उलगडून मांडत अनमोल माहिती उपलब्ध करून दिली, असे प्रतिपादन श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त गजानन घोंगे यांनी केले. श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानच्या सभागृहात सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दिनदर्शिकेची प्रथम प्रत शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाला श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोटचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले, ज्येष्ठ पत्रकार मोहन बोरगावकर, मधुकरराव रगडे, खंडेलवाल महाविद्यालयाचे अधीक्षक निशिकांत देशपांडे, आकाश कुळकर्णी, सामर्थ्यचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, संस्थेचे सल्लागार ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, कार्यकारिणी सदस्य राजकुमार उखळकर, श्रीराम देशपांडे, विजय शिंदे, किरण चौक, विशाल पुरंदरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

सामर्थ्य फाउंडेशनने विविध सामाजिक कार्य राबविण्यासोबतच वैचारिक चळवळ देखील निर्माण केली. संस्थेचे उपक्रम आदर्श असल्याचे गजानन घोंगे पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन दिनदर्शिका काढण्यामागील उद्देश विषद करण्यात आला. कार्यक्रमाला भाविक, श्री राजराजेश्वर संस्थानचे कर्मचारी वृंद, सामर्थ्यचे सदस्य उपस्थित होते.

‘सामर्थ्य’ दिनदर्शिकेत ‘अकोल्याचा वारसा’

सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिकेमध्ये ‘अकोल्याचा वारसा’ या अंतर्गत शहरातील महत्त्वपूर्ण स्थळांची माहिती मांडण्यात आली आहे. यामध्ये शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर, श्री तपे हनुमान मंदिर, सुंदराबाई खंडेलवाल टॉवर, असदगड किल्ला, नरनाळा किल्ला आदींचा इतिहास नमूद केला आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका अकोलेकरांसाठी अनमोल ठेवा ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *