शहरातील सामर्थ्य फाउंडेशनने अल्पावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक कार्यातून आपले वेगळेपण जपले. ‘सामर्थ्य’ने दिनदर्शिकेतून सुद्धा ‘अकोल्याचा वारसा’ उलगडून मांडत अनमोल माहिती उपलब्ध करून दिली, असे प्रतिपादन श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त गजानन घोंगे यांनी केले.
श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानच्या सभागृहात सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.