पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२५

गणेशोत्सवात भक्ति-भावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपणाऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट व जनजागृतीपर देखावा स्पर्धा आयोजित केली आहे.

गणेशोत्सवात भक्ति-भावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपणाऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट व जनजागृतीपर देखावा स्पर्धा आयोजित केली आहे.

प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार
(गणपतीची चांदीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)

पुरस्कार प्रायोजक – चि.चिन्मय विनोद देव, अकोला.

तीन प्रोत्साहनपर पारितोषिक
(चांदीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) प्रोत्साहनपर पारितोषिक
प्रायोजक – स्व.श्री.दिनकरराव देशमुख (सेवानिवृत्त कलाशिक्षक) यांच्या स्मृतीनिमित्त : श्री.संजय देशमुख, अकोला

उत्कृष्ट शाळा प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार
(स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)
प्रायोजक – स्व. दादासाहेब रत्नपारखी यांच्या स्मृतीनिमित्त : श्री प्रमोद रत्नपारखी, अकोला.

उत्कृष्ट स्वहस्ते मूर्ती निर्मिती प्रथम, द्वितीय पुरस्कार
(चांदीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)
प्रायोजक – स्व. एकनाथपंत चाळीसगांवकर यांच्या स्मृतीनिमित्त : श्री.प्रशांत चाळीसगांवकर, अकोला.

उत्कृष्ट देखावा प्रथम, द्वितीय पुरस्कार
(चांदीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)
प्रायोजक – श्री.मिलिंद देव, अकोला.

पर्यावरणपूरक उत्कृष्ट सजावट पुरस्कार: (चांदीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)
प्रायोजक – स्व.गजानन उखळकर यांच्या स्मृतीनिमित्त : श्री. राजकुमार उखळकर, अकोला.

  • सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होणाऱ्या प्रथम तीन शाळांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.
  • स्पर्धा संपूर्णतः नि:शुल्क
  • शालेय विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटासाठी स्पर्धा खुली

नियम

  • संपूर्ण मातीची गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट असावी.
  • देखाव्याचे सर्व साहित्य पर्यावरण पूरक असणाऱ्यांना प्राधान्य.
  • पर्यावरणस्नेही सजावटीसोबतच शैक्षणिक, वाहतूक सुरक्षा जनजागृतीपर देखाव्यांना प्राधान्य.
  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी समन्वयकांच्या खालील कुठल्याही एका मोबाइल क्रमांकावरील व्हॉटस्ॲपवर आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, शालेय विद्यार्थी असल्यास शाळेचे नाव, वर्ग आदींसह आपल्या घरगुती गणेशोत्सवाचे छायाचित्र व एक लहान व्हिडिओ पाठवावा.
  • निवडक उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव स्पर्धकांकडे परीक्षक स्वत: येऊन निरीक्षण करतील. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ४ सप्टेंबर २०२५. स्पर्धा अकोला शहरापुरतेच मर्यादित.

स्पर्धा समन्वयक

राजेंद्र निकुंभ
मो.नं. – ९४२३४२८०५४

मिलिंद देव
मो.नं. – ९८५०९१५८०८

अशोक पेटकर
मो.नं.- ९९६०६२१३९९

पर्यावरणस्नेही उपक्रमात गणेशभक्तांनी अवश्य सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
सामर्थ्य फाउंडेशन, अकोला व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *