सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने सुरुवातीपासून पर्यावरण संवर्धनावर भर देण्यात आली आहे. संस्था स्थापन होण्याच्या अगोदरपासून वृक्षारोपण कार्य करण्यात येत आहे. २०२२ वर्षांमध्ये संस्थेने तब्बल दीड हजार वृक्षरोपण करण्यात आले.
हे दीड हजार वृक्ष व ट्रि-गार्ड संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. दिनेश चंदन यांनी स्वखर्चातून संस्थेला उपलब्ध करून देण्याचे आदर्श केले. केवळ वृक्षारोपणावरच मर्यादित न राहता ते मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करण्याचा विढाच संस्थेच्या सदस्यांनी उचलला.
उन्हाळ्यामध्ये अकोला शहरातील ४५ डिग्री अं.से. तापमानामध्ये वृक्षांना जगविण्यासाठी ‘सामर्थ्य’च्या सदस्यांची धडपड असते. आपल्या घरून पाण्याची बॉटल आणत त्या वृक्षांना पाणी टाकल्या जाते. वृक्षांच्या संगोपनासाठी ‘सामर्थ्य’वान सदस्यांची सर्वोतोपरी प्रयत्न असतात.