Category प्रसारमाध्यमांमध्ये ‘सामर्थ्य’
विविध प्रसार माध्यमांमध्ये सामर्थ्य फाउंडेशनच्या बातम्या आपण इथे पाहू शकता…
सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३ (मातृशक्ती विशेष)-तृतीय पुष्प
सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३ (मातृशक्ती विशेष)-द्वितीय पुष्प
सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३ (मातृशक्ती विशेष)-प्रथम पुष्प
सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३
अकोला : सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने ३ ते ५ डिसेंबरदरम्यान तीन दिवसीय सामर्थ्य व्याखानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर व समाजसेवी डॉ. स्मिता कोल्हे पुष्प गुंफणार आहेत. या माध्यमातून वैचारिक मेजवानी उपलब्ध होईल.
सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट
Read Moreसामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाटपर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२३
पर्यावरणपूरक उपक्रम नव्या पिढीसाठी दिशादर्शक – डॉ. गजानन नारे ‘सामर्थ्य’च्या गणेशोत्सव स्पर्धेत मेघा राजूरकर प्रथम, नमन पनपालिया द्वितीय, तर डॉ. स्मिता कोरडेंना तृतीय पुरस्कार पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सामर्थ्य फाउंडेशनने सर्व वयोगटासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली. संस्थेचा घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी येथे केले. सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अकोला एज्युकेशन सोसायटीच्या टिळक सभागृहात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोला एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.डॉ. एस.आर.अमरावतीकर, तर व्यासपीठावर संजय देशमुख, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव आदी उपस्थित होते. न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक माधव मुंशी, ऑल इंडिया कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभजितसिंह बछेर, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे महासचिव सिध्दार्थ शर्मा, मराठी थिऑसाॅफिकल फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. संजय पोटे, समाजसेवक नीलेश देव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहसचिव सुर्यकांत बुडकले, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगांवकर, डॉ. दीपक दामोदरे आदींनी केले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, पत्रकार राजकुमार उखळकर, किरण चौक, श्रीराम देशपांडे, दिनेश चंदन, विलास राठोड, मिलिंद देव, विजय मोहरीर, मुकुंद देशमुख, अशोक पेटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण केले. परीक्षक डॉ. अशोक सोनोने, डॉ. श्रीकांत उखळकर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. चिन्मय देव यांनी प्रयोजित केलेल्या प्रथम पुरस्काराचे मानकरी मेघा राजूरकर, द्वितीय पुरस्कार नमन पनपालिया, तृतीय पुरस्कार डॉ.स्मिता कोरडे, तर संजय देशमुख यांनी प्रायोजित केलेले प्रोत्साहनपर पारितोषिक वैष्णवी ढवळे (राठोड), वैष्णवी मोहरीर, सचिन बेलोकार, चैताली बुंदेले यांना जाहीर केले. मान्यवरांच्या हस्ते चांदीची गणेशमूर्तीची फ्रेम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. निरंतर सुरू असलेले सामर्थ्यचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत प्रा.एस.आर. अमरावतीकर यांनी व्यक्त केले. पर्यावरणस्नेही सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेतून प्रोत्साहित करण्यात आल्याचे प्रबोध देशपांडे यांनी…
प्रथम वर्धापन दिन २०२३
Read Moreप्रथम वर्धापन दिन २०२३सामर्थ्य फाउंडेशनच्या वर्धापनदिन सोहळ्यात समाजप्रबोधन
पैशांच्या ‘चमक’मुळे समाजातील मन:शांती हरवली – सत्यपाल महाराज अकोला : भौतिक सुख-सुविधेच्या मागे समाज धावत सुटला आहे. ते मृगजळ असल्याची कल्पना असूनही त्याचा स्वीकार करायचा नाही. पैशांच्या ‘चमक’पुढे आकर्षित होऊन देहभान, सामाजिक कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरले आहेत. त्यामुळेच जीवनात तणाव वाढून समाजातील सुख, शांती, समाधान हरवले, असे मत राष्ट्रीय समाजप्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी आज येथे व्यक्त केले. सामर्थ्य फाउंडेशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त रविवारी श्री.रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात आयोजन सोहळ्यात ते बोलत होते. दि बेरार जनरल एज्युकेशन सोयायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मानद सचिव पवनकुमार माहेश्वरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, सामर्थ्यचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसिद्ध चित्रकार सतिश पिंपळे यांनी रेखाटलेले तैलचित्र देऊन सत्यपाल महाराजांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांचा सत्कार ‘सामर्थ्य’चे कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहसचिव सुर्यकांत बुडखले, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगावकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, डॉ. श्रीकांत उखळकर, कार्यकारिणी सदस्य राजकुमार उखळकर, दिनेश चंदन, किरण चौक, श्रीराम देशपांडे, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, विजय शिंदे, प्रकाश जाधव, मुकुंद देशमुख आदींनी केला. तैलचित्राचा अर्थबोध मिलिंद देव यांनी सांगितला. यावेळी संस्थेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते केले. संकेतस्थळाची माहिती प्रा.दत्तराज विद्यासागर यांनी दिली. सत्यपाल महाराजांची सामाजिक सद्यस्थिती, कुटुंब व्यवस्था, तणावावरओघवत्या शैलीत भाष्य केले. आज मनुष्य भौतिक सुविधांच्या मागे लागला. जीवनात ती मिळवण्याची लालसा असते. मात्र, त्यातून शांती-समाधान प्राप्त होत नाही. अनेकांना सुखाची झोप सुद्धा लागत नाही. समाजासाठी सुद्धा आपण काही देणे लागतो, याचे भान ठेऊन सामाजिक कार्यातून जीवनात समाधान शोधा, असे आवाहन सत्यपाल महाराजांनी केले. आधुनिक जीवनात तणाव वाढला. त्या तणावातूनच आत्महत्येसारखे टोकाचे विचार मनात येतात. आजची तरुण पिढी मोबाइल सारख्या साधनांच्या आहारी जावून भान विसरली. कुटुंबामध्ये आपसातील संवाद हरवला आहे. विभक्त व चौकोनी कुटुंबामुळे मन मोकळे करायला देखील कुणी सापडत नाही. त्यांची सुरक्षा धोक्यात येते. एकत्र कुटुंब व्यवस्था सर्वश्रेष्ट असल्याचे ते म्हणाले.सामर्थ्य फाउंडेशनने सामाजिक कार्यासह वैचारिक चळवळ निर्माण केल्याचे ज्येष्ठ पक्षमित्र दीपक जोशी यांनी सांगितले.…