पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२४

गणेशोत्सवात भक्ति-भावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपणाऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट व जनजागृतीपर देखावा स्पर्धा आयोजित केली आहे.

प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार

(गणपतीची चांदीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र), पुरस्कार प्रायोजक – चि. चिन्मय विनोद देव, अकोला

तीन प्रोत्साहनपर पारितोषिक

(चांदीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र), प्रोत्साहनपर पारितोषिक प्रायोजक – स्व. श्री. दिनकरराव देशमुख (सेवानिवृत्त कलाशिक्षक) यांच्या स्मृतीनिमित्त: श्री.संजय देशमुख, अकोला.

नियम

  •  संपूर्ण मातीची गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट असावी.
  •  पर्यावरणस्नेही सजावटीसोबतच जनजागृतीपर देखाव्याला प्राधान्य.
  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी समन्वयकांच्या खालील कुठल्याही एका मोबाइल क्रमांकावरील व्हॉटस्ॲपवर आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, शालेय विद्यार्थी असल्यास शाळेचे नाव, वर्ग आदींसह आपल्या घरगुती गणेशोत्सवाचे छायाचित्र व एक लहान व्हिडिओ पाठवावा.
  •  निवडक उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव स्पर्धकांकडे परीक्षक स्वत: येऊन निरीक्षण करतील. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • स्पर्धा संपूर्णत: नि:शुल्क असून सर्व वयोगटासाठी आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर २०२४.
  • स्पर्धा अकोला शहरापुरतेच मर्यादित.

स्पर्धा समन्वयक

  1. रवींद्रकुमार बुलनकर: मो. नं. – ९८-८१-२००-३५५
  2. सुर्यकांत बुडकले: मो. नं. – ९९-७५-१७-१२-७७
  3. प्रशांत चाळीसगावकर: मो. नं. – ९५०-३४१-७००२

पर्यावरणस्नेही उपक्रमात गणेशभक्तांनी अवश्य सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
– सामर्थ्य फाउंडेशन, अकोला व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अकोला.

3 Comments

  1. “गणेश मूर्ती”शाडू मातीची मूर्ती व पर्यावरण पूरक सजावट

  2. Should you be investigating channels for direct video engagements, grasping the diverse features of livejasmin can be extremely helpful. Should you be drawn to livejasmin_cams or the livejasmin_studio options, every option provides varied possibilities for audiences and artists equally. For a comprehensive look and some helpful tips, head to [url=https://livejustcams.com]livejasmin[/url] for extra details.

    Also, livejasmin_video and livejasmin-stream options support uninterrupted and premium broadcasting experiences that improve user engagement. It’s beneficial to looking into these options to benefit fully from your time on the platform and embrace consistent live content.

    Your comment is awaiting moderation.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *