admin

admin

पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२४

सामर्थ्य फाउंडेशन, अकोला व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अकोलाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२४ गणेशोत्सवात भक्ति-भावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपणाऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट व जनजागृतीपर देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम,…

‘सामर्थ्य’ने सामाजिक कार्यातून वेगळेपण जपले – गजानन घोंगे

शहरातील सामर्थ्य फाउंडेशनने अल्पावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक कार्यातून आपले वेगळेपण जपले. ‘सामर्थ्य’ने दिनदर्शिकेतून सुद्धा ‘अकोल्याचा वारसा’ उलगडून मांडत अनमोल माहिती उपलब्ध करून दिली, असे प्रतिपादन श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त गजानन घोंगे यांनी केले.

सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

शहरातील सामर्थ्य फाउंडेशनने अल्पावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक कार्यातून आपले वेगळेपण जपले. ‘सामर्थ्य’ने दिनदर्शिकेतून सुद्धा ‘अकोल्याचा वारसा’ उलगडून मांडत अनमोल माहिती उपलब्ध करून दिली, असे प्रतिपादन श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त गजानन घोंगे यांनी केले. श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानच्या सभागृहात सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दिनदर्शिकेची प्रथम प्रत शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला अर्पण करण्यात आली.

सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३ (मातृशक्ती विशेष)-तृतीय पुष्प

राजकीय आरक्षणामुळे स्त्रियांचा धोरणात्मकरित्या सहभाग वाढून देशाचा आणखी विकास होईल. लोकशाहीमध्ये आरक्षण महिलांच्या विकासाचे माध्यम आहे. राजकीय आरक्षणामुळे महिलांची जबाबदारी वाढली. केवळ सत्ता, खुर्ची व पदांसाठी नव्हे तर समाजासाठी महिलांना कार्य करावे लागेल, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे व्यक्त केले.

सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३ (मातृशक्ती विशेष)-द्वितीय पुष्प

समाजातील विकृती वाढत असून कमी वयाच्या मुलींवर अत्याचार होतात. स्त्रियांवरील हिंसा, कौटुंबिक अत्याचार, हुंडाब‌ळी वाढले. समाजातील हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. याविरोधात समाजातील जागरुक झालेल्या चळवळीतील महिला तसेच सर्व घटकांनी पेटून उठण्याची गरज आहे. एकत्र येऊन लढा दिला तरच या महिलांवरील अत्याचाराला पायबंद लागण्यास मदत होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या तथा विचारवंत प्रा.अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३ (मातृशक्ती विशेष)-प्रथम पुष्प

मेळघातील महिलांच्या जीवनात सहजता, आनंद व समाधान आहे, त्या उलट शहरी भागातील महिलांमध्ये निराशावाद, असमाधानपणा आढळून येतो. मेळघाट व शहरी भागातील महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मेळघाटातील महिलांमध्ये स्वावलंबन आहे. विदेशात जाऊन आपण स्वावलंबन स्वीकारतो, तेच आपल्या देशातील शहरांमध्ये का स्वीकारले जात नाही? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी करीत साध्या गोष्टीतून आनंद उपभोगता आला पाहिजे, असा सल्ला दिला.

धोरणात्मक सहभाग वाढण्यासाठी स्त्रियांना राजकीय आरक्षण – डॉ. नीलम गोऱ्हे

राजकीय आरक्षणामुळे स्त्रियांचा धोरणात्मकरित्या सहभाग वाढून देशाचा आणखी विकास होईल. लोकशाहीमध्ये आरक्षण महिलांच्या विकासाचे माध्यम आहे. राजकीय आरक्षणामुळे महिलांची जबाबदारी वाढली. केवळ सत्ता, खुर्ची व पदांसाठी नव्हे तर समाजासाठी महिलांना कार्य करावे लागेल, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे व्यक्त केले.

महिला अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची गरज – प्रा. अंजली आंबेडकर

समाजातील विकृती वाढत असून कमी वयाच्या मुलींवर अत्याचार होतात. स्त्रियांवरील हिंसा, कौटुंबिक अत्याचार, हुंडाब‌ळी वाढले. समाजातील हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. याविरोधात समाजातील जागरुक झालेल्या चळवळीतील महिला तसेच सर्व घटकांनी पेटून उठण्याची गरज आहे. एकत्र येऊन लढा दिला तरच या महिलांवरील अत्याचाराला पायबंद लागण्यास मदत होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या तथा विचारवंत प्रा.अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मेळघाटात महिलांच्या जीवनात सहजता, तर शहरी भागात निराशावाद – डॉ. स्मिता कोल्हे

मेळघातील महिलांच्या जीवनात सहजता, आनंद व समाधान आहे, त्या उलट शहरी भागातील महिलांमध्ये निराशावाद, असमाधानपणा आढळून येतो. मेळघाट व शहरी भागातील महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मेळघाटातील महिलांमध्ये स्वावलंबन आहे. विदेशात जाऊन आपण स्वावलंबन स्वीकारतो, तेच आपल्या देशातील शहरांमध्ये का स्वीकारले जात नाही? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी करीत साध्या गोष्टीतून आनंद उपभोगता आला पाहिजे, असा सल्ला दिला.

सामर्थ्य व्याख्यानमाला २०२३

अकोला : सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने ३ ते ५ डिसेंबरदरम्यान तीन दिवसीय सामर्थ्य व्याखानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर व समाजसेवी डॉ. स्मिता कोल्हे पुष्प गुंफणार आहेत.…

सामर्थ्य व्याख्यानमालेची वैचारिक मेजवानी

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा.अंजली आंबेडकर व डॉ. स्मिता कोल्हे पुष्प गुंफणार अकोला : सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने ३ ते ५ डिसेंबरदरम्यान तीन दिवसीय सामर्थ्य व्याखानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विचारवंत तथा वंचित…

‘सामाजिक उपक्रमांची पहाट’ मधून निराधारांच्या जीवनात दिवाळीचा गोडवा

‘सामर्थ्य’च्या पुढाकारातून वस्त्रदान व गरजूंना फराळाची मेजवानी अकोला : वंचित, गरजू, निराधारांच्या जीवनात दिवाळसणाचा आनंद पेरुन ‘सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने राबविण्यात आला. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्यांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे देऊन खमंग फराळाची मेजवानी देण्यात आली.…

अकोल्यात सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट

samarthyafoundation

सामर्थ्य फाउंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम; गरजूंच्या जीवनात आनंद पेरणार अकोला : वंचित, गरजूंच्या जीवनात दिवाळसणाचा आनंद पेरुन सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट हा नाविन्यपूर्ण उपक्रम सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने राबविला जाणार आहे. हलाखीच्या परिस्थित जीवन जगणाऱ्यांना दिवाळीचा गोडवा देण्याचा प्रयत्न उपक्रमातून केला जाईल. दीपोत्सवानिमित्त…

पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२३

पर्यावरणपूरक उपक्रम नव्या पिढीसाठी दिशादर्शक – डॉ. गजानन नारे ‘सामर्थ्य’च्या गणेशोत्सव स्पर्धेत मेघा राजूरकर प्रथम, नमन पनपालिया द्वितीय, तर डॉ. स्मिता कोरडेंना तृतीय पुरस्कार पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सामर्थ्य फाउंडेशनने सर्व वयोगटासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपली…

पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२३

samarthyafoundation

गणेशोत्सवात भक्ति-भावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपण्याऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट व जनजागृतीपर देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार(गणपतीची चांदीची फ्रेम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)पुरस्कार प्रायोजक – चि.चिन्मय विनोद देव, अकोला.तीन प्रोत्साहनपर पारितोषिक(चांदीचे नाणे, स्मृतिचिन्ह व…

सामर्थ्य फाउंडेशनच्या वर्धापनदिन सोहळ्यात समाजप्रबोधन

पैशांच्या ‘चमक’मुळे समाजातील मन:शांती हरवली – सत्यपाल महाराज अकोला : भौतिक सुख-सुविधेच्या मागे समाज धावत सुटला आहे. ते मृगजळ असल्याची कल्पना असूनही त्याचा स्वीकार करायचा नाही. पैशांच्या ‘चमक’पुढे आकर्षित होऊन देहभान, सामाजिक कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरले आहेत. त्यामुळेच जीवनात तणाव वाढून…

सामर्थ्य फाऊंडेशन – प्रथम वर्धापन दिन

आज सामर्थ्य फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आदरणीय सत्यपाल महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. अकोल्याचे सुप्रसिद्ध कलाकार श्री सतीश पिंपळे यांनी हे सुंदर पोर्ट्रेट रेखाटले आहे. या पोर्ट्रेट मध्ये सात ह्या अंकाला फार महत्व आहे. सूर्यप्रकाशात लपलेले इंद्रधनुषी सात रंग,…

वस्त्रदान उपक्रम

मेळघाटातील गरजूंच्या चेहऱ्यावर फुलला आनंद मेळघाटातील वंचित, गरजू आदिवासी नागरिकांना मदत मिळण्याच्या दृष्टीने सामर्थ्य फाउंडेशनने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. समाजातून चांगले, वापरण्यास योग्य कपडे गोळा करून ते मेळघाटमधील दुर्गम गाव धारुर धारगड येथे वाटप करण्यात आले. परिधान करण्यासाठी उत्कृष्ट…