Category नवीन उपक्रम

पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२४

सामर्थ्य फाउंडेशन, अकोला व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अकोलाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२४ गणेशोत्सवात भक्ति-भावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपणाऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट व जनजागृतीपर देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार (गणपतीची चांदीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र), पुरस्कार प्रायोजक – चि. चिन्मय विनोद देव, अकोला तीन प्रोत्साहनपर पारितोषिक (चांदीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र), प्रोत्साहनपर पारितोषिक प्रायोजक – स्व. श्री. दिनकरराव देशमुख (सेवानिवृत्त कलाशिक्षक) यांच्या स्मृतीनिमित्त: श्री.संजय देशमुख, अकोला. नियम स्पर्धा समन्वयक पर्यावरणस्नेही उपक्रमात गणेशभक्तांनी अवश्य सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.– सामर्थ्य फाउंडेशन, अकोला व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अकोला.

Read Moreपर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२४

सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

शहरातील सामर्थ्य फाउंडेशनने अल्पावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक कार्यातून आपले वेगळेपण जपले. ‘सामर्थ्य’ने दिनदर्शिकेतून सुद्धा ‘अकोल्याचा वारसा’ उलगडून मांडत अनमोल माहिती उपलब्ध करून दिली, असे प्रतिपादन श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त गजानन घोंगे यांनी केले. श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानच्या सभागृहात सामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दिनदर्शिकेची प्रथम प्रत शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला अर्पण करण्यात आली.
Read Moreसामर्थ्य फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

धोरणात्मक सहभाग वाढण्यासाठी स्त्रियांना राजकीय आरक्षण – डॉ. नीलम गोऱ्हे

राजकीय आरक्षणामुळे स्त्रियांचा धोरणात्मकरित्या सहभाग वाढून देशाचा आणखी विकास होईल. लोकशाहीमध्ये आरक्षण महिलांच्या विकासाचे माध्यम आहे. राजकीय आरक्षणामुळे महिलांची जबाबदारी वाढली. केवळ सत्ता, खुर्ची व पदांसाठी नव्हे तर समाजासाठी महिलांना कार्य करावे लागेल, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे व्यक्त केले.
Read Moreधोरणात्मक सहभाग वाढण्यासाठी स्त्रियांना राजकीय आरक्षण – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची गरज – प्रा. अंजली आंबेडकर

समाजातील विकृती वाढत असून कमी वयाच्या मुलींवर अत्याचार होतात. स्त्रियांवरील हिंसा, कौटुंबिक अत्याचार, हुंडाब‌ळी वाढले. समाजातील हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. याविरोधात समाजातील जागरुक झालेल्या चळवळीतील महिला तसेच सर्व घटकांनी पेटून उठण्याची गरज आहे. एकत्र येऊन लढा दिला तरच या महिलांवरील अत्याचाराला पायबंद लागण्यास मदत होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या तथा विचारवंत प्रा.अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.
Read Moreमहिला अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची गरज – प्रा. अंजली आंबेडकर

मेळघाटात महिलांच्या जीवनात सहजता, तर शहरी भागात निराशावाद – डॉ. स्मिता कोल्हे

मेळघातील महिलांच्या जीवनात सहजता, आनंद व समाधान आहे, त्या उलट शहरी भागातील महिलांमध्ये निराशावाद, असमाधानपणा आढळून येतो. मेळघाट व शहरी भागातील महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मेळघाटातील महिलांमध्ये स्वावलंबन आहे. विदेशात जाऊन आपण स्वावलंबन स्वीकारतो, तेच आपल्या देशातील शहरांमध्ये का स्वीकारले जात नाही? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी करीत साध्या गोष्टीतून आनंद उपभोगता आला पाहिजे, असा सल्ला दिला.
Read Moreमेळघाटात महिलांच्या जीवनात सहजता, तर शहरी भागात निराशावाद – डॉ. स्मिता कोल्हे

सामर्थ्य व्याख्यानमालेची वैचारिक मेजवानी

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा.अंजली आंबेडकर व डॉ. स्मिता कोल्हे पुष्प गुंफणार अकोला : सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने ३ ते ५ डिसेंबरदरम्यान तीन दिवसीय सामर्थ्य व्याखानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर व समाजसेवी डॉ. स्मिता कोल्हे पुष्प गुंफणार आहेत. या माध्यमातून वैचारिक मेजवानी उपलब्ध होईल. सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून दि बेरार जनरल एज्युकेशन साेसायटीच्या सहकार्याने सामर्थ्य व्याख्यानमालेचे आयोजन केले. शहरातील श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात ३ ते ५ डिसेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प स्व.पांडुरंग राठोड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘मेळघाटातील महिलांचे स्थान आणि सामाजिक कार्यातील भूमिका’ या विषयावर गुंफले जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवी डॉ. स्मिता कोल्हे प्रमुख वक्त्या म्हणून, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेरार संस्थेचे मानद सचिव पवनकुमार माहेश्वरी उपस्थित राहतील. ज्येष्ठ समाजसेवी डॉ. रवींद्र कोल्हे, स्त्री मूळव्याध तज्ज्ञ डॉ. सुनीती राठाेड, डॉ. सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहील. स्व. गौकर्णाबाई पांडुरंग भिरड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ द्वितीय पुष्प पुणे येथील विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, तर वंचित आघाडीचे विभागीय अध्यक्ष बालमुकुंद भिरड यांची प्रमुख उपस्थिती राहील. ५ डिसेंबरला स्व. रवींद्र इधोळ यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प गुंफण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे येणार आहेत. ‘भारतीय लोकशाही व्यवस्थेत महिलांची भूमिका आणि आरक्षण’ या विषयावर त्या व्याख्यान देतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता उपस्थित राहतील. डॉ. श्रुती इधोळ, डॉ. सागर इधोळ यांची प्रमुख उपस्थिती राहील. व्याख्यानमालेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सामर्थ्यचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, मार्गदर्शक पवनकुमार कछोट, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, नितीन डोंगरे, प्रा.अशोक सोनोने, ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, डॉ. श्रीकांत उखळकर, डॉ. सागर इधोळ, कायदेविषयक सल्लागार ॲड.संतोष भाेरे,…

Read Moreसामर्थ्य व्याख्यानमालेची वैचारिक मेजवानी

‘सामाजिक उपक्रमांची पहाट’ मधून निराधारांच्या जीवनात दिवाळीचा गोडवा

‘सामर्थ्य’च्या पुढाकारातून वस्त्रदान व गरजूंना फराळाची मेजवानी अकोला : वंचित, गरजू, निराधारांच्या जीवनात दिवाळसणाचा आनंद पेरुन ‘सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने राबविण्यात आला. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्यांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे देऊन खमंग फराळाची मेजवानी देण्यात आली. शहरातील सुमारे ५०० निराधारांना कपडे व फराळाचे वाटप केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. दीपोत्सवानिमित्त प्रत्येक घरात चैतन्याचे वातावरण असते. नवीन कपडे, फटाक्यांचे आतषबाजी व खमंग फराळाच्या मेजवानीचा आनंद घेतला जातो. समाजातील गरजू, निराधारांना सुद्धा सणाचा आनंद मिळण्यासाठी सामर्थ्य फाउंडेशनने पुढाकार घेतला. अनेक गरजूंच्या जीवनात दिवाळीचा आनंद पेरण्यासाठी ‘सामर्थ्य’ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे कपड्यांसह चविष्ट फराळाचे वाटप केले. मिष्टान्नाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या निवासस्थानी प्रातिनिधिक स्वरूपात उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. योगीता कछोट, सम्यक आणि संयम कछोट यांच्या हस्ते गरजूंना साहित्याचे वितरण केले. यावेळी संस्थाध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहसचिव सुर्यकांत बुडकले, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगांवकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, प्रा.अशोक सोनोने, कायदेविषयक सल्लागार ॲड.संतोष भाेरे, कार्यकारिणी सदस्य राजकुमार उखळकर, दिनेश चंदन, मिलिंद देव, किरण चौक, श्रीराम देशपांडे, विलास राठोड, मुकुंद देशमुख, संजय देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शहरातील गरजू, निराधारांच्या जीवनात दिवाळीचा आनंद पेरण्याचा ‘सामर्थ्य’चा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना पवनकुमार कछोट यांनी व्यक्त केली. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी रस्त्याच्या कडेला राहणारे, शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीतील रहिवासी, बसस्थानक, रेल्वेस्थानक व मंदिरांपुढील भिक्षेकरी यांच्यासह असंख्य गरजूंना कपडे व फराळ वाटप केले. दिवाळीमध्ये सलग पाच दिवस हा उपक्रम राबविण्यात आला.

Read More‘सामाजिक उपक्रमांची पहाट’ मधून निराधारांच्या जीवनात दिवाळीचा गोडवा
samarthyafoundation

अकोल्यात सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट

सामर्थ्य फाउंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम; गरजूंच्या जीवनात आनंद पेरणार अकोला : वंचित, गरजूंच्या जीवनात दिवाळसणाचा आनंद पेरुन सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट हा नाविन्यपूर्ण उपक्रम सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने राबविला जाणार आहे. हलाखीच्या परिस्थित जीवन जगणाऱ्यांना दिवाळीचा गोडवा देण्याचा प्रयत्न उपक्रमातून केला जाईल. दीपोत्सवानिमित्त प्रत्येक घरात चैतन्याचे वातावरण असते. नवीन कपडे, फटाक्यांचे आतषबाजी व खमंग फराळाच्या मेजवानीचा आनंद घेतला जातो. समाजातील गरजू, निराधार या आनंदापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येते. रस्त्याच्या कडेला राहणारे, शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीतील रहिवासी व मेळघाटातील दुर्गम भागातील निराधारांसह अनेक गरजूंच्या जीवनात दिवाळीचा आनंद पेरण्यासाठी सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने सामाजिक उपक्रमांची दिवाळी हा विशेष उपक्रम हाती घेतला. यामध्ये लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबिजेच्या दिवशी पहाटे निराधारांना कपड्यांसह चविष्ट फराळाचे वाटप केले जाणार आहे. मिष्टान्नाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली जाईल. महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. अनेकांकडे चांगले दर्जेदार वस्त्र वापराअभावी पडून असतात. कपडे लहान होत असल्याने त्याचा वापर होत नाही. सामाजिक दिवाळी उपक्रमात नवीनसह समाजाकडून प्राप्त चांगल्या कपड्यांचे सुद्धा वितरण होईल. घरी निरुपयोगी असलेल्या वापरण्यायोग्य इतर वस्तू देखील गरजूंपर्यंत पोहोचवल्या जातील. या उपक्रमासाठी रोख मदतही देता येईल. समाजातील दानशूर व्यक्तींनी कपडे, साहित्य व मदत जमा करण्यासाठी सुर्यकांत बुडकले (९९७५१७१२७७) अकोला कराओके क्लब गुप्ते रोड जठारपेठ, अकोला, प्रशांत चाळीसगांवकर (९५०३४१७००२)मुकुंद मंदिराजवळ रामदास पेठ व विजय मोहरीर (९८५०३६२३३४)आकृती स्टुडिओ, उमरी रोड टॉवर चौक येथे संपर्क करता येईल. या उपक्रमात अकोलेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, नितीन डोंगरे, प्रा.अशोक सोनोने, ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, कायदेविषयक सल्लागार ॲड.संतोष भाेरे, निमंत्रित तज्ज्ञ डॉ.श्रीकांत उखळकर, कार्यकारिणी सदस्य राजकुमार उखळकर, दिनेश चंदन, किरण चौक, श्रीराम देशपांडे, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, नकुल राठी, प्रकाश जाधव, सुधीर धुळधुळे, मुकुंद देशमुख, मिलिंद शनवारे, मिलिंद देव, अशोक पेटकर, फुलसिंग राठोड, प्रा. दत्तराज विद्यासागर, मुकेश मिना आदींनी केले. ‘फराळ’ स्वरूपात मदतीचा…

Read Moreअकोल्यात सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट
samarthyafoundation

पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२३

गणेशोत्सवात भक्ति-भावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपण्याऱ्या गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट व जनजागृतीपर देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार(गणपतीची चांदीची फ्रेम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)पुरस्कार प्रायोजक – चि.चिन्मय विनोद देव, अकोला.तीन प्रोत्साहनपर पारितोषिक(चांदीचे नाणे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र)प्रोत्साहनपर पारितोषिक प्रायोजक – स्व.श्री.दिनकरराव देशमुख (सेवानिवृत्त कलाशिक्षक) यांच्या स्मृतीनिमित्त : श्री.संजय देशमुख, अकोला. नियम स्पर्धा समन्वयकरवींद्रकुमार बुलनकर: मो.नं. – ९८८१२००३५५सुर्यकांत बुडकले: मो.नं. – ९९७५१७१२७७प्रशांत चाळीसगावकर: मो.नं.-९५०३४१७००२ पर्यावरणस्नेही उपक्रमात गणेशभक्तांनी अवश्य सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. सामर्थ्य फाउंडेशन, अकोला.(नोंदणी क्र.- एफ-२१०४५)

Read Moreपर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धा २०२३

सामर्थ्य फाऊंडेशन – प्रथम वर्धापन दिन

आज सामर्थ्य फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आदरणीय सत्यपाल महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. अकोल्याचे सुप्रसिद्ध कलाकार श्री सतीश पिंपळे यांनी हे सुंदर पोर्ट्रेट रेखाटले आहे. या पोर्ट्रेट मध्ये सात ह्या अंकाला फार महत्व आहे. सूर्यप्रकाशात लपलेले इंद्रधनुषी सात रंग, सप्तपदी, सप्तनद्या, सप्तर्षी, आयुष्यात सात वर्षाच्या टप्याने होणारे महत्त्वाचे बदल, ई. अनेक आहेत. आपल्यासाठी भूषणास्पद असलेली आजची आपली सत्कारमूर्ती आदरणीय श्री सत्यपाल महाराज ‘सप्तखंजेरी’ वादक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनोख्या खंजेरीवादनातून, आधुनिक किर्तनातून ते सातत्याने समाजप्रबोधनाचे सत्कार्य करतात. त्यांच्या या कलेला मानाचे अभिवादन जग प्रसिद्ध चित्रकार श्री सतीश पिंपळे यांनी तयार केलेल्या चित्राद्वारे, सामर्थ्य फाऊंडेशन करीत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. श्री सतीश पिंपळे कोरोना काळात जरी नागपुरात होते तरी ते आता पून: अकोला येथे आले आहेत ही देखील आनंदाची गोष्ट आहे. एक दोनच नव्हे तर चक्क सात खंजेरी अतिशय लिलया हाताळत असतांना, उजव्या हातातील जळता काकडा हा कुप्रथा दर्शवीतो, त्यावर आघात करीत, डाव्या हातातील खंजेरीला उच्च स्थान देणारे श्री सत्यपाल महाराज हात उंचावत हसतमुखाने प्रबोधन करतात. त्यांना सामर्थ्य फाऊंडेशनचा मानाचा मुजरा!

Read Moreसामर्थ्य फाऊंडेशन – प्रथम वर्धापन दिन

वस्त्रदान उपक्रम

मेळघाटातील गरजूंच्या चेहऱ्यावर फुलला आनंद मेळघाटातील वंचित, गरजू आदिवासी नागरिकांना मदत मिळण्याच्या दृष्टीने सामर्थ्य फाउंडेशनने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. समाजातून चांगले, वापरण्यास योग्य कपडे गोळा करून ते मेळघाटमधील दुर्गम गाव धारुर धारगड येथे वाटप करण्यात आले. परिधान करण्यासाठी उत्कृष्ट वस्त्र मिळाल्याने गरजू आदिवासींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने सामाजिकसह विविध लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. शहरामध्ये अनेकांकडे चांगले दर्जेदार वस्त्र वापराअभावी पडून असतात. अनेकवेळा कपडे लहान होत असल्याने त्याचा वापर होत नाही. समाजासह संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांकडून सुस्थितीतील वस्त्र गोळा करून ते मेळघाटातील आदिवासी गावामध्ये वाटण्याचा उपक्रम सामर्थ्य फाउंडेशनने सुरू केला आहे. यासाठी अकोला शहरातून मोठ्या प्रमाणात वस्त्र गोळा करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत हजारो शर्ट, पॅन्ट, साडी, ड्रेस, लहान मुलांचे कपडे संस्थेकडे जमा केले. ते सर्व कपडे स्वच्छ धुवून प्रेस करण्यात आले. त्यानंतर वाहनांमधून हे कपडे मेळघाटातील दुर्गम गाव धारुर धारगड येथे नेण्यात आले. गावातील गरजू ग्रामस्थांना या कपड्यांचे वाटप केले. यावेळी सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहसचिव सुर्यकांत बुडखले, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगावकर, कार्यकारिणी सदस्य दिनेश चंदन, राजकुमार उखळकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, नितीन डोंगरे, प्रा.अशोक सोनोने, ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, कायदेविषयक सल्लगार ॲड.संतोष भाेरे, निमंत्रित तज्ज्ञ डॉ.श्रीकांत उखळकर, किरण चौक, श्रीराम देशपांडे, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, मिलिंद शनवारे, मिलिंद देव, नकुल राठी, प्रकाश जाधव, सुधीर धुळधुळे, मुकुंद देशमुख, मुकेश मिना, विजय मोहरीर, प्रा. दत्तराज विद्यासागर आदी उपस्थित होते. पुनर्वसन झालेल्या धारुर धारगड गावात वस्त्रदान करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आनंद व समाधान व्यक्त केले. कपडे घेण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. चिमुकल्यांना खाऊंची मेजवानी सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वस्त्रदान उपक्रमांतर्गत धारुर धारगड गावात चिमुकल्यांना विविध खाऊंची मेजवानी देखील देण्यात आली. खाऊ मिळाल्याने लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

Read Moreवस्त्रदान उपक्रम

पुस्तक व गणवेश वाटप

मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठान व सामर्थ्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळा क्र. ७ येथे पुस्तक व गणवेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी ‘पुस्तक वाचन’ स्पर्धा घेऊन विजेत्या स्पर्धकांना मा.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित केले. पुस्तके माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्रोत – प्रा.संजय खडसे स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठान व सामर्थ्य फाउंडेशनचा विशेष उपक्रमअकोला : वाचनातून ज्वलंत कल्पनाशक्ती, ज्ञान आणि शब्दसंग्रह विकसित होतो. पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्रोत आहे. प्रेरणादायी पुस्तके आपले जीवन बदलू शकतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनात सातत्य ठेवा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी येथे केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठान व सामर्थ्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळा क्र. ७ येथे पुस्तक व गणवेश वाटप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती सदस्य भीमराव डोंगरे होते. यावेळी डॉ. श्रीकांत उखळकर, राजकुमार उखळकर, अनुश्री उखळकर, सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, श्रीराम देशपांडे, विजय शिंदे, अरुण देशमुख, मुख्याध्यापक हरिशचंद्र इटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शाळेला उपयुक्त पुस्तकांचा संच भेट देऊन विद्यार्थ्यांना देखील पुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. पुढे बोलतांना प्रा. संजय खडसे म्हणाले, वाचनाची सवय लावण्याचे अनेक फायदे आहेत. हे तुमचे मन सक्रिय, मजबूत आणि निरोगी ठेवते. तुमच्या एकूण वैयक्तिक वाढीसाठी आणि विकासासाठी वाचन महत्त्वाचे आहे. चरित्रे वाचणे आपल्याला कठोर परिश्रम करण्यास आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी समर्पित राहण्यास देखील प्रोत्साहित करू शकते. डॉ. श्रीकांत उखळकर यांनी वाचनाचे महत्त्व सांगून स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने गरजू शाळा व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. वाचनाची सवय लावण्याचे अनेक फायदे आहेत. हे तुमचे मन सक्रिय, मजबूत आणि निरोगी ठेवते. तुमच्या एकूण वैयक्तिक वाढीसाठी आणि विकासासाठी वाचन महत्त्वाचे आहे, असे प्रबोध देशपांडे म्हणाले. महापालिकेच्या शाळा क्र. ७ मधून गुणवत्त विद्यार्थी घडत आहे, असे भीमराव डोंगरे यांनी सांगितले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक हरिशचंद्र इटकर यांनी गत पाच वर्षात शाळेमध्ये वाढलेली…

Read Moreपुस्तक व गणवेश वाटप

सामर्थ्य व्याख्यानमाला

सामर्थ्य फाउंडेशनने दि बेरार जनरल एज्युकेशन साेसायटीच्या सहकार्यातून ११ ते १३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान तीन दिवसीय सामर्थ्य व्याखानमाला घेतली. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प ‘परिस्थिती आज आणि उद्या’ या विषयावर आंतरराष्ट्रीय विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुंफले. द्वितीय पुष्प ‘शहरी नक्षलवाद – प्रचार आणि वास्तव’ या विषयावर नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा नक्षलवादाचे अभ्यासक देवेंद्र गावंडे यांनी, तर तृतीय पुष्प ‘ऊर्जा क्षेत्रापुढील आव्हाने, वीज ग्राहकांवरील परिणाम व त्यांची भूमिका’ या विषयावर महावितरणचे संचालक (वाणिज्य) तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे यांनी गुंफले. या माध्यमातून अकोलेकरांना वैचारिक मेजवानी लाभली. व्यवस्थेतील हुजरेगिरी मोडीत काढण्याची गरज – ॲड. प्रकाश आंबेडकर प्रथम पुष्प – ‘परिस्थिती आज आणि उद्या’ अकोला : संविधानानुसार चालणाऱ्या भारतात लोकशाही असून येथे नागरिकांचे राज्य आहे. नागरिकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात लोकप्रतिनिधी कारभार चालविण्यासाठी निवडून दिले जातात. देशाचा खरा मालक मतदारच आहे. मात्र, ही संकल्पना समाजात रुजली नाही. गुलामगिरीच्या स्वभावातून हुजरेगिरीची मानसिकता आली. समाज व्यवस्थेतून हुजरेगिरी मोडीत काढण्याची गरज आहे, असे मत विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी व सामर्थ्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने श्री रा.ल.तो विज्ञान महाविद्यालयात आयोजित सामर्थ्य व्याख्यानमालेत ‘परिस्थिती आज आणि उद्या’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतांना ते बोलत होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी बेरार संस्थेचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता होते, तर सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील परिस्थिती, अर्थव्यवस्था, आरक्षण, युवा पिढी, संस्कृती आदींवर विस्तृत भाष्य केले. पुढे बोलतांना ते म्हणाले, आपण स्वत:ला देशाचा मालक समजत नाही. कारण ही संकल्पना आपल्यात रुजलीच नाही. इतर देशांमध्ये निवडून गेलेल्या प्रतिनिधीने काही गैरप्रकार केल्यास त्याला पोलिसांकडून शिक्षा मिळते. तो त्यांच्या समाजव्यवस्थेचा भाग आहे.आपल्या येथे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस लोकप्रतिनिधींची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असतात. सरकारला ‘मायबाप सरकार’ संबोधतो. तेव्हाही नागरिकांच्या गुलामगिरीची जाणीव होते. आपण आता स्वतंत्र झालो, हे मान्य करायलाच तयार नाही. त्यामुळे ही व्यवस्था समाजातून बाहेर काढावी लागेल. संसदीय…

Read Moreसामर्थ्य व्याख्यानमाला

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा

घरगुती गणेशोत्सवात पर्यावरण व जनजागृतीपर आकर्षक देखावा-सजावट स्पर्धा ‘सामर्थ्य’च्यावतीने दरवर्षी घेण्यात येते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सोबत घेऊन संस्था वृक्षारोपण व संवर्धनाची विशेष मोहीम देखील राबवते.सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘सामर्थ्य’ने विविध उपक्रम हाती घेतले. ‘सामर्थ्य’ने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत विविध पुरस्कार देऊन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संपूर्ण मातीची गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट व जनजागृतीपर देखावा करणाऱ्या गणेशभक्तांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पर्यावरण अभ्यासक्र व ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव, तर पुरस्कार प्रायोजक चिन्मय देव, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सचिव डॉ. गजानन वाघोडे, स्पर्धा समन्वयक प्रवीण पळसपगार, सुर्यकांत बुडकले, प्रशांत चाळीसगांवकर यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कायदेविषयक सल्लागार ॲड. संतोष भोरे, कार्यकारिणी सदस्य श्रीराम देशपांडे, किरण चौक, दिनेश चंदन, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, सुधीर धुळधुळे, मिलिंद शनवारे, मुकुंद देशमुख आदींनी केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परीक्षक दीपक जोशी व ज्येष्ठ व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी स्पर्धकांच्या गणेशोत्सवाचे सुक्ष्मपणे निरीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला. प्रथम पुरस्काराचे मानकरी संजय देशमुख ठरले, द्वितीय पुरस्कार मेघा राजुरकर, तृतीय पुरस्कार राजेंद्र सोनवणे, तर प्रोत्साहनपर पारितोषिकासाठी ऋषिकेश मिलिंद गायकवाड व शीला जोशी यांनी निवड परीक्षकांनी केली. मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोपटे देऊन विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत सहभागी इतर स्पर्धकांना देखील प्रमाणपत्र व रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.

Read Moreपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा

दिमाखदार उद्घाटन सोहळा व व्याख्यान

जिद्द व चिकाटीने कार्य केल्यास क्रांती निश्चित… – डॉ. शंकरबाबा पापळकर अकोला : सामाजिक क्षेत्रात झोकून देत कार्य करण्याची गरज आहे. जिद्द व चिकाटीने काम केल्यास सामाजिक परिवर्तन होऊन क्रांती निश्चित होऊ शकते, असे मत ज्येष्ठ समाजसेवी, अनाथांचे नाथ डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी येथे व्यक्त केले.श्री. रालतो विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित सामर्थ्य फाउंडेशन व जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, तर विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी निमा अरोरा उपस्थित होत्या. दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, श्री. रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार प्रकार पोहरे, डॉ.राजीव बियाणी, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, कनिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.‘सामाजिक क्षेत्रात बदललेले स्वरूप व स्वयंसेवी संस्थांची भूमिका’ या विषयावर डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी सविस्तर मांडणी केली. पुढे बोलतांना ते म्हणाले, सामाजिक कार्यात झपाट्याने बदल होत आहेत. नेहमीचेच कार्य करण्याऐवजी सामाजिक संस्थांनी आपल्या कार्यात देखील बदल करण्याची गरज आहे. मोठे प्रकल्प राबवून स्वयंसेवी संस्थांनी परिवर्तनाची चळवळ हाती घेतली पाहिजे. त्यातून तरुणांसाठी रोजगार निर्मिती देखील होईल. ती खरी समाजसेवा ठरेल. जगातील १०० सर्वश्रेष्ट विद्यापीठांमध्ये आपल्या देशातील एकही विद्यापीठ नाही. ही खरी शोकांतिका आहे. देशातील शिक्षण पद्धती देखील प्रगत होण्याची गरज डॉ. पापळकर यांनी व्यक्त केली. आदर्श ज्येष्ठ समाजसेवींकडून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा तरुणांना मिळत असते. त्या प्रेरणीतून तरुणांनी समाजसेवेकडे वळण्याची गरज जिल्हाधिकारी निमा आरोरा यांनी व्यक्त केली. अकोल्यात कार्य करण्यासाठी मोठी संधी असून सामाजिक कार्यातून आत्मसमाधान प्राप्त होत असल्याचे ॲड. मोतीसिंह मोहता म्हणाले. निराधारांची नि:स्वार्थ सेवा करून स्वयंसेवी संस्थांनी आत्मबल वाढविण्याचे कार्य करावे, सामर्थ्य फाउंडेशनने सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन प्रा.संजय खडसे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. विलास…

Read Moreदिमाखदार उद्घाटन सोहळा व व्याख्यान

वझ्झरचा अभ्यास दौरा

आपल्या कृतीतून सामाजिक कार्याचा आदर्श पायंडा पाडणारे, शेकडो अनाथांचे नाथ, श्रेष्ठ मार्गदर्शक, अंध, अपंग, अनाथ मुलं-मुलींसाठी आपले जीवन वाहणारे ज्येष्ठ समाजसेवी डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी अथक परिश्रमातून उभारलेल्या अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह (आश्रम), वझ्झर, परतवाडा, जि.अमरावती येथे सामर्थ्य फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी भेट दिली. यावेळी अंध, अपंग, अनाथ मुलं-मुलींसाठी डॉ. शंकरबाबा पापळकर करीत असलेल्या अलौकिक कार्याची प्रचिती सामर्थ्यच्या सदस्यांना आली. या आश्रमात १३० मुला-मलींचा सांभाळ डॉ. शंकरबाब करतात. त्यांनी आतापर्यंत १४० पेक्षाअधिक मुलींचे लग्न थाटा-माटात लावली आहेत. डॉ. शंकरबाबा यांनी सामर्थ्यच्या सर्व सदस्यांचे अतिशय आनंदाने स्वागत करीत संपूर्ण आश्रम दाखवत त्याची माहिती दिली. डॉ. शंकरबाबा यांचे अद्भूत कार्य अनुभवून सामर्थ्यचे सदस्य भारावले होते. डॉ. शंकरबाबांकडून सामर्थ्यच्या सदस्यांनी सामाजिक कार्याचे धडे घेतले.

Read Moreवझ्झरचा अभ्यास दौरा

वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य

सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने सुरुवातीपासून पर्यावरण संवर्धनावर भर देण्यात आली आहे. संस्था स्थापन होण्याच्या अगोदरपासून वृक्षारोपण कार्य करण्यात येत आहे. २०२२ वर्षांमध्ये संस्थेने तब्बल दीड हजार वृक्षरोपण करण्यात आले. हे दीड हजार वृक्ष व ट्रि-गार्ड संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. दिनेश चंदन यांनी स्वखर्चातून संस्थेला उपलब्ध करून देण्याचे आदर्श केले. केवळ वृक्षारोपणावरच मर्यादित न राहता ते मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करण्याचा विढाच संस्थेच्या सदस्यांनी उचलला. उन्हाळ्यामध्ये अकोला शहरातील ४५ डिग्री अं.से. तापमानामध्ये वृक्षांना जगविण्यासाठी ‘सामर्थ्य’च्या सदस्यांची धडपड असते. आपल्या घरून पाण्याची बॉटल आणत त्या वृक्षांना पाणी टाकल्या जाते. वृक्षांच्या संगोपनासाठी ‘सामर्थ्य’वान सदस्यांची सर्वोतोपरी प्रयत्न असतात.

Read Moreवृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य